महाविद्यालयात परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीशी प्राध्यापकाचे आक्षेपार्ह वर्तन, डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र

वाशी: एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सुरक्षिततेसाठी तातडीचे पाऊल – डॉ. गोऱ्हेंचे पत्र
या घटनेनंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दहावीच्या पेपरमध्ये कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
महत्त्वाच्या उपाययोजना:
शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे
परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे
गुप्त तक्रार नोंदणी यंत्रणा तयार करणे
महिला निरीक्षकांची नेमणूक करणे
विद्यार्थ्यांसाठी जागरूकता सत्रे आयोजित करणे
शून्य-सहिष्णुता धोरणाची अंमलबजावणी
डॉ. गोऱ्हेंनी लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘शून्य-सहिष्णुता धोरण’ लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
परीक्षेदरम्यान नियुक्त सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांशी शारीरिक संपर्क, इशारे किंवा कोणत्याही आक्षेपार्ह वर्तनासाठी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दोषी आढळल्यास तात्काळ नोकरीवरून निलंबन किंवा शिस्तीची कारवाई केली जाईल.
ही नियमावली परीक्षा स्थळांवर आणि संबंधितांच्या नियुक्तीपत्रांमध्ये स्पष्टपणे नमूद केली जाईल.
सीसीटीव्ही देखरेख आणि तक्रार प्रणाली
परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही बसवून सतत निरीक्षण करणे गरजेचे आहे.
कॅमेऱ्यांचा फुटेज परीक्षा संपल्यानंतर किमान एक महिना संग्रहित ठेवणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांसाठी गुप्त तक्रार यंत्रणा सुरू करून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेची हमी
महिला पोलिसांची गुप्त नेमणूक – परीक्षा केंद्रांवर साध्या वेषातील महिला पोलीस तैनात कराव्यात.
तक्रारींवर त्वरीत कारवाई – जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल, तर तातडीने त्यांना समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळेल.