Economy

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन!


सोलापूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि.10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्य:स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे ( उदा.आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या दि.09 जुलै 2024 अन्वये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे.  या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते.

आता मा. मुख्यमंत्री महोदय यांनी घोषित केल्यानुसार आता दि.10 मार्च 2025 शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला.

 या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन DBT द्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे योजनेच्या या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे Aadhar Seeded DBT होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते Aadhar Seeding करून घ्यावी.

तसेच ज्या आस्थापना हे या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 दि.10 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी (Aadhar Verify) अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंट ला आधार लिंक आहे, तोच बँक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन DBT साठी नमुद करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे योजनेच्या 

 सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापनानी प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना/नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सोलापूर यांच्याशी दि.30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी.

उमेदवारांना व आस्थापनांना त्याबाबत काही समस्या असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर या कार्यालयास 0217-2992956 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button