AIच्या नव्या ट्रेंडची चाहत्यांना भुरळ; पाहा कसा बनवायचा आपला Ghibli फोटो
जपानी अॅनिमेशन स्टुडिओ घिबलीच्या सौंदर्यावर आधारित प्रतिमा तयार करण्याची सुविधा आता युजर्सना मिळत आहे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता कलात्मक अभिव्यक्तीचे नवे क्षितिज गाठत आहे. सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय,स्टुडिओ घिबलीच्या शैलीतील AI-निर्मित चित्रे! ChatGPT च्या नव्या फीचरमुळे अनेक युजर्स, प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय नेते आपली छायाचित्रे जपानी अॅनिमेशन स्टुडिओ घिबलीच्या सौंदर्यात रंगवू शकतात.
तुमची स्वतःची ‘घिबली-स्टाईल‘ DP कशी बनवाल?
जर तुम्हालाही घिबली-प्रेरित प्रोफाईल फोटो बनवायचा असेल, तर हा प्रक्रिया अतिशय सोपी आहे:
- ChatGPT उघडा – ChatGPT वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाईल अॅप उघडा.
- तुमचा फोटो अपलोड करा – प्रोम्प्ट बॉक्सच्या तळाशी असलेल्या ‘+’ चिन्हावर क्लिक करून प्रतिमा जोडा.
- प्रॉम्प्ट टाका – “Ghiblify this” किंवा “हे स्टुडिओ घिबलीच्या शैलीत बदला” असे लिहा.
- तयार झालेली कलाकृती डाउनलोड करा – AI-निर्मित घिबली-स्टाईल प्रतिमा सेव्ह करा.
- संपादन आणि अपलोड करा – आवश्यक असल्यास प्रतिमा योग्य आकारात बदलून तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर अपलोड करा.
OpenAI कडून AI-निर्मित कलांचे नवीन तंत्रज्ञान
OpenAI ने आपल्या ChatGPT-4.0 अपडेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कलाकृती निर्माण करण्याची क्षमता आणखी विकसित केली आहे. जपानी अॅनिमेशन स्टुडिओ घिबलीच्या सौंदर्यावर आधारित प्रतिमा तयार करण्याची सुविधा आता युजर्सना मिळत आहे. ‘Spirited Away’ आणि ‘Howl’s Moving Castle’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या घिबली स्टुडिओचा प्रसिद्ध अॅनिमेटर हायाओ मियाझाकी यांनी ह्या शैलीला एक वेगळा दर्जा दिला आहे.
मियाझाकी यांची कलाकृतींमध्ये हँड-ड्रॉन अॅनिमेशन, सौम्य रंगसंगती आणि अद्भुत लँडस्केप्स दिसून येतात. दोन वेळा ऑस्कर जिंकलेल्या मियाझाकी यांच्या जादूई कथांमधून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
Big Breaking : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगोलमध्ये कोसळला एलियन? नागरिक म्हणाले…
AI-निर्मित घिबली शैलीवरील संमिश्र प्रतिक्रिया
AI च्या या नव्या फीचरमुळे सोशल मीडियावर घिबली-शैलीतील प्रतिमा मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. अनेक युजर्स स्वतःच्या छायाचित्रांना जादूई रूप देत आहेत, तर काही जण अगदी नवीन दृश्ये फक्त मजकूर (text prompts) टाकून तयार करत आहेत.
मात्र, ह्या ट्रेंडबद्दल कलाक्षेत्रात संमिश्र भावना उमटत आहेत. काही जण AI-आधारित कला लोकांसाठी संधी निर्माण करत असल्याचे मानतात, तर काही पारंपरिक अॅनिमेटर्स ह्या तंत्रज्ञानामुळे हाताने तयार केलेल्या कलाकृतींच्या किंमतीत घट होईल, अशी चिंता व्यक्त करत आहेत.
तथापि, AI-निर्मित घिबली-शैलीतील कला लोकप्रिय होत चालली असून, डिजिटल जगतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सर्जनशीलतेच्या वाढत्या सहसंबंधावर यामुळे प्रकाश टाकला जात आहे.