क्रीडा

चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव, राजस्थान रॉयल्सचा ६ धावांनी विजय

महेंद्रसिंग धोनी शेवटच्या षटकांत संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी


गुवाहाटी : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2025 मध्ये आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) पराभूत केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) 6 धावांनी पराभव करत चेन्नईला आणखी एक धक्का दिला.

गुवाहाटीतील या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नितीश राणाच्या तडाखेबाज 81 धावांच्या खेळी आणि लेग-स्पिनर वानिंदु हसरंगाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आपल्या हंगामातील पहिला विजय मिळवला.

हसरंगाने रचला विक्रम

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानच्या विजयात वानिंदु हसरंगाच्या भेदक फिरकी गोलंदाजीने मोठी भूमिका बजावली. त्याने 4 षटकांत 35 धावा देत 4 बळी घेतले आणि IPL मध्ये आपले नाव विक्रमाच्या यादीत नोंदवले.

रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एक खास विक्रम रचला.

हसरंगाने राहुल त्रिपाठी, CSK कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि विजय शंकर यांना माघारी धाडले. यासह तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध IPL सामन्यात 4 बळी घेणारा तिसरा फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम हरभजन सिंग आणि ब्रॅड हॉग यांनी केला होता. तसेच, राजस्थान रॉयल्ससाठी IPL मध्ये CSK विरुद्ध 4 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा हसरंगा हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी 2008 मध्ये सोहेल तन्वीरने 14 धावांत 6 बळी घेतले होते.

CSK विरुद्ध 4 किंवा अधिक विकेट घेणारे फिरकीपटू:

5/18 – हरभजन सिंग (MI), वानखेडे स्टेडियम, 2011

4/29 – ब्रॅड हॉग (KKR), कोलकाता, 2015

4/35 – वानिंदु हसरंगा (RR), गुवाहाटी, 2025

कर्णधार गायकवाडची खेळी वाया

लक्षाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार 63 धावांची खेळी केली. मात्र, अन्य फलंदाजांकडून त्याला पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकांत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. मागील सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या धोनीने यावेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. जेव्हा तो मैदानात आला, तेव्हा चेन्नईला 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. त्याने तुषार देशपांडेच्या चेंडूंवर चौकार आणि षटकार लगावले. मात्र, अखेरच्या षटकात संदीप शर्माच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर उभ्या शिमरोन हेटमायरने अप्रतिम झेल घेतला आणि CSK च्या विजयाच्या आशांना पूर्णविराम दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button