

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत

फोटोमध्ये पाहायला मिळतं की मोनालिसाने हिरव्या रंगाचा गाउन परिधान केला आहे.

मोनालिसा सध्या दुबईमध्ये असून तिने बुर्ज खलिफासमोर खास पोज दिल्या आहेत. मोनालिसाचे हे फोटो तिचे चाहते लाईक करत आहेत आणि कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “तुम्ही खूप निरागस दिसत आहात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, “तुमचं हास्य खूपच छान आहे.”

मोनालिसा ही एक प्रसिद्ध भोजपुरी स्टार आहे, परंतु तिने ‘मनी है तो हनी है’ आणि ‘खूबसूरत नौकरानी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

‘अंतरा बिस्वास’ या खऱ्या नावाने ओळखली जाणारी मोनालिसा हिने ‘देवरा बड़ा सतावेला’ आणि ‘सात सहेलियां’ यांसारख्या भोजपुरी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.