Chahat Khanna
विशेष प्रतिनिधी : ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘कुबूल है’ यांसारख्या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री चाहत खन्ना सध्या चर्चेत आहे. ‘थँक यू’ आणि ‘प्रस्थानम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, चाहत खन्नाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
तिला विचारले की, कधी कास्टिंग काउचचा सामना केला आहे का, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र, त्यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीत ‘शेडी कॉन्ट्रॅक्ट्स‘ कसे असतात, याबद्दल भाष्य केलं.
“कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं”
ती म्हणाली, दक्षिणेत सगळीकडे असं चालतं’. दक्षिणेकडील इंडस्ट्री या बाबतीत खूप उघड आहे, पण ते महिलांचा आदरही करतात. हीच बाब इथे (बॉलिवूडमध्ये) सुद्धा आहे. फक्त फरक एवढाच की तिकडे हे स्पष्टपणे सांगितलं जातं, तर इथे ते फक्त बोलून न सांगता गुपचूप असतं; इथे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहित नाहीत.
चाहत खन्नाच्या या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत वागणूक, तसेच कास्टिंगच्या मागच्या अटी व शर्ती याबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
