November 12, 2025

शैक्षणिक

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयामधील संगणकशास्त्र विभागातील प्रा. जिब्राईल ईलाही बागवान, प्रा. गणेश अरुण पैलवान, प्रा. अश्विनी रामचंद्र पवार, प्रा. कुमारी पूनम छगन हेटकळे हे चार प्राध्यापक विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली च्या संलग्नतेने  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या स्टेट एलिजि बिलिटी टेस्ट(सेट) मध्ये पात्र झाले आहेत. सदर परीक्षेत महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व सांगोला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने यशस्वी प्राध्यापकांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षबाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार .नागेश गुळमिरे, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडूनही प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सदर यशाबद्दल सर्व स्तरावरून सर्व यशस्वी प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे.