भूमिअभिलेख विभागाची डिजिटल क्रांती,‘प्रत्यय’ प्रणाली नागरिकांच्या सेवेत
फेरफार, तक्रारी, अपील आणि पुनर्विलोकन अर्ज घरबसल्या ऑनलाइन दाखल करता येणार

मुंबई/सहदेव खांडेकर : भूमिअभिलेख विभागाने नागरिकांसाठी ‘प्रत्यय’ ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली सुरू केली असून, ती राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामुळे भूमिअभिलेखाशी संबंधित अपिलांची नोंदणी, सद्यस्थिती, नोटीस, सुनावणीच्या तारखा आणि निकाल सहज ऑनलाइन पाहता येणार आहे.
ही प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, तसेच कामकाज अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जल्लोष नववर्षाचा, गुढीपाडव्याच्या उत्साहात महाराष्ट्र दंग; घराघरात गुढ्या उभारून सणाचा जल्लोष
‘प्रत्यय’ प्रणालीचे नागरिकांना होणारे फायदे:
फेरफार, तक्रारी, अपील आणि पुनर्विलोकन अर्ज घरबसल्या ऑनलाइन दाखल करता येणार.
तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर अर्ज दाखल करण्याची सुविधा.
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलदगतीने पार पडणार.
१०० दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘प्रत्यय’ प्रणालीमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर व आधुनिक सेवा मिळणार असून, भविष्यात महसूल प्रशासन डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.