सिंहगड महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाइन उपनियमानुसार” या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाइन उपनियमानुसार ” या विषयावर व्याख्यान संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी व्याख्यात्या सौ. किमया थोतागारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या व्याख्यानमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमजली इमारतींची प्लॅंनिंग व त्याचे उप नियमानुसार योग्यतेची पडताळणी करण्याविषयी अतिथी व्याख्यान दि. ११ एप्रिल २०२५ १०.३० ते १२.०० या कालावधीत संपन्न झाले. या व्याख्यानासाठी पंढरपूर येथील सौ. किमया थोतागारे हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आरसीसी इमारतीची प्लॅनिंग अँड डिजाईन माहिती देऊन त्याची उपनियमानुसार आखणी कशी केली पाहिजे याबद्दलची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या व्याखानाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरसाठी खूप फायदा होईल.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समन्वयक प्रा. शेखर पाटील आणि डॉ. यशवंत पवार उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळे दरम्यान ६० विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या आर. सी. सी. इमारतींचे मॉडेलिंग, प्लॅनिंग व नियमानुसार समजून घेतले. तसेच या व्याखानाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रतिनिधी पूजा घायाळ आणि स्नेहा कदम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता स्थापत्य विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.