
विशेष प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील महाराजपूर भागात भर लग्नमंडपात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वरमालाच्या क्षणी नवरदेवाच्या थरथरत्या हातांनी नवरीला शंका आली, आणि क्षणातच तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दारू व नशा नात्याच्या पवित्र बंधनात विघ्न ठरली; दोन्ही घरांत वाद.
सायंकाळी वाजतगाजत वरात आली आणि सर्व विधी उत्साहात सुरू झाले. पण जेव्हा नवरदेव स्टेजवर उभा राहिला आणि वरमाला घालण्याचा क्षण आला, तेव्हा नवरीची नजर त्याच्या हाताकडे गेली, जे जोरात थरथरत होते.
त्याच क्षणी नवरीने थांबा म्हणून सांगितलं आणि विचारलं, “हात का थरथरत आहेत?” नवरदेव गप्प राहिला. घरच्यांनी ही घबराट असल्याचं सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नवरीला शंका आली की, हा दारूच्या नशेत आहे किंवा एखाद्या आजाराने त्रस्त आहे.
पंचायतीचा निकाल लग्न मोडलं
या प्रश्नावरून दोन्ही पक्षांत वाद वाढत गेला. प्रकरण पंचायतीपुढे गेलं. अनेक चर्चा, समजावणी आणि वादावादी झाली. अखेर नवरीने ठामपणे नकार दिला. “मी अशा व्यक्तीशी लग्न करणार नाही,” असं तिने स्पष्ट केलं.
पंचायतीने दोन्ही पक्षांना आपापसातील देवाणघेवाण परत करण्याचा निर्णय दिला. नवरदेवाची वरात नवरीशिवाय रिकामी परत गेली. सकाळपर्यंत चाललेला हा ड्रामा संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983