पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठात “विनाअनुदानित संकल्पना व स्वरूप” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
वरिष्ठ लिपिक डॉ.शिरीष अनिता शामराव बंडगर यांचे सर्व स्तरातून कौतुक

सोलापूर, पवन आलाट : पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “विनाअनुदानित संकल्पना व स्वरूप” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रो. डॉ. लक्ष्मीकांत दामा, मा. कुलसचिव श्रीमती योगिनी घारे मॅडम, प्रो. डॉ. जगन कराडे, प्रो. डॉ. गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर होते. या पुस्तकामध्ये लेखक डॉ.शिरीष अनिता शामराव बंडगर यांनी उच्च शिक्षणातील “विनाअनुदानित” व्यवस्थेची संकल्पना, त्यातील आव्हाने, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यावर सखोल लिहिले आहे.
यावेळी कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर बोलताना म्हणाले, या पुस्तकांमुळे शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक विचारप्रवाह निर्माण होण्यास मदत मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी, राजाभाऊ सरवदे साहेब, डॉ. मीना गायकवाड मॅडम माजी प्राचार्या वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर व कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष रविराज शिंदे, मालकारसिद्ध हैंनाळकर, वसंत सपताळे मेजर, उपाध्यक्ष श्रीमती मंगल सोनकवडे, किरण कऱ्हाळे, संतोष कोळी,कार्याध्यक्ष रवींद्रनाथ हिप्परगे, विकास राठोड, दिलीप हाके,महेश कोळी, विशाल चाकूरकर, मंगेश कुलकर्णी, संदीप पोटे, मारुती कोळी, श्रीमती सविता वडावंराव, रुपाली हुंडेकरी, ज्योती कोकणे, डॉ. अंजली साखरे,डॉ. अर्चना माने, फैजुनिस्सा नाईकवाडी, संध्याराणी लोखंडे, रेखा कस्तुरे, रमेश गिऱ्हे, श्रीमती जनाबाई राख, रविकुमार कुरणे मेजर , आतिष हावळे, शेषेराव हणमंते, प्रमोद देवेकर, विवेक कदम, शरद पवार, रोहित सोनवणे, हर्षल काळे, मिलिंद शिंदे, महादेव काळे, वैभव कासेगावकर, राजू भोसले, भिकाजीं माने, सोनकांबळे, सुधीर वाघमारे, बनसोडे व इतर पदाधिकारी, सदस्य मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी लेखकांशी संवाद साधून आपले प्रश्न मांडले. संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उपस्थितीत अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.