Shanaya Kapoor
मुंबई : संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या शनाया कपूर लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिच्या बॉलिवूड एंट्रीची चर्चा गेले काही दिवसांपासून रंगली असून, अद्याप डेब्यू झाला नसतानाही शनायाच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आगामी प्रोजेक्ट्समध्ये ओटीटी सिरीजपासून ते चित्रपटांपर्यंत विविध संधी मिळाल्या असून, ती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या गाजलेल्या फ्रँचायजी ‘स्टुडंट ऑफ द इयर’* च्या तिसऱ्या भागात मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ या वेब सिरीजच्या स्वरूपात तयार केली जाणार आहे. या सिरीजचे शूटिंग २० एप्रिल २०२५ पासून मुंबईत सुरू होणार असून, ही सिरीज ६ भागांची असणार आहे. विशेष म्हणजे, रीमा माया या सिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
एका अहवालानुसार, या वेब सिरीजचे शूटिंग ३० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. सूत्रानी सांगितले, “गेल्या सहा वर्षांपासून SOTY 3 या प्रोजेक्टवर काम सुरू होते. अखेर करण जोहर यांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. २० एप्रिलपासून याचे शूटिंग सुरू होणार असून यासाठी अतिशय टाईट शेड्यूल आखण्यात आले आहे.
या सिरीजमध्ये शनाया डबल रोल साकारणार असल्याचंही समोर आलं आहे. अशी अपेक्षा आहे की ही सिरीज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
बॉलिवूडमध्ये एक चमकणारा तारा म्हणून शनाया कपूरची ही दमदार सुरुवात निश्चितच चाहत्यांच्या अपेक्षा वाढवणारी ठरणार आहे.
