बार्बी नाही, ही तर जाह्नवी आहे! नवा हेअरकट, डीप नेक ड्रेस आणि धुमाकूळ!

मनोरंजन डेस्क : बॉलीवूडची यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री जाह्नवी कपूर सध्या तिच्या अपकमिंग फिल्म ‘परम सुंदरी’मुळे चर्चेत आहे. पण यावेळी सिनेमाच्या प्रमोशनपेक्षा तिच्या ‘बार्बी लूक’मुळेच ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

जाह्नवीने नुकताच नवीन हेअरकट करून घेतला आहे – अगदी फ्रंट बँग्ससह असा हेअरस्टाईल की थेट बार्बी डॉलला टक्कर देईल! या नवीन लूकसह तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि मग काय – इंटरनेटवर थेट तहलका!

या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये झगमगताना दिसत आहे. खुले केस, ग्लॉसी मेकअप, स्टायलिश गॉगल आणि उंच हिल्स यामुळे तिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय – म्हणजे थेट बार्बी डॉलचं बॉलीवूड व्हर्जनच!

नवा हेअरकट + ग्लॅमरस ड्रेस = सोशल मीडियावर धिंगाणा. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एकाने तर म्हटलंच, “बार्बी डॉल पण लाजली असती बघून!”