२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल, बिल गेट्स यांचा विश्वास
भारतीय तरुण हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी विश्वास व्यक्त केला आहे की,२०४७ पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयास येईल आणि याचा फायदा संपूर्ण जगालाही मिळेल. भारताने आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रात मोठी प्रगती साधल्याने हा देश भविष्यात आणखी वेगाने विकसित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताचा विकास दर ५% पेक्षा कमी जाणार नाही – बिल गेट्स
भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल बोलताना बिल गेट्स म्हणाले की, विकास दर ५% असेल की १०% यावर वाद होऊ शकतो, पण तो ५% च्या खाली जाणार नाही. आर्थिक विस्तारामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल, ज्यामुळे महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील.
भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक
गेट्स यांनी आधार,यूपीआय यांसारख्या भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “या सुविधा जगासाठी भारताचे मोठे योगदान आहे. मी भारतात आल्यावर अनेक कंपन्यांना या सुविधांचा फायदा घेताना पाहतो.”
India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर परिणाम नाही
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडतील, परंतु त्यामुळं नोकऱ्या जाणार नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. भारताने स्थानिक गरजांनुसार ओपन-सोर्स फाउंडेशन मॉडेल स्वीकारले आहे, तसेच भारतीय भाषांना पाठिंबा देत आहेत.
भारतीय तरुण देशाच्या विकासाचा कणा – बिल गेट्स
गेट्स म्हणाले, “भारतीय तरुण हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.” त्यांनी नमूद केले की, भारताचा विकास केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला फायदा करून देणारा ठरेल.