मोठी बातमी,१ एप्रिल पासून बँकेच्या नियमांत हे होणार बदल
ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बंधनकारक

मुंबई/सहदेव खांडेकर : 1 एप्रिल 2025 पासून बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नव्या निर्देशांनुसार सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बदलांचा थेट परिणाम बँक ग्राहकांवर होणार आहे.
एटीएम व्यवहारांवरील नवीन मर्यादा:
काही बँकांनी ATM मधून विना शुल्क पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.
एका महिन्यात इतर बँकेच्या ATM मधून केवळ तीन वेळा पैसे काढता येणार असून, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर ₹25 शुल्क लागू होईल.
डिजिटल बँकिंग आणि सुरक्षितता:
डिजिटल बँकिंग सेवांसाठी AI आधारित तंत्रज्ञान लागू होणार.
ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बंधनकारक होणार.
बँक खात्यात शिल्लक रकमेवर नवे नियम:
राष्ट्रीयकृत बँकांनी बँक खात्यात शिल्लक रक्कम संदर्भात नवीन धोरण आखले आहे.
ग्रामीण आणि शहरी भागांतील खात्यांसाठी वेगवेगळ्या मर्यादा असतील.
खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर दंड वसुली केली जाईल.
बचत प्रमाणपत्र ३१ मार्चपर्यंतच ! १ एप्रिलपासून योजना बंद…!
चेक व्यवहारांमध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू:
₹5,000 पेक्षा जास्त रकमेच्या चेक व्यवहारांमध्ये चेक नंबर, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम आधीच बँकेला कळवणे बंधनकारक राहील.
यामुळे चेक फसवणुकीच्या घटना रोखता येतील.
मुदत ठेवीवरील (FD) व्याजदर बदल:
बँकांच्या नव्या नियमानुसार, शिल्लक रकमेच्या प्रमाणात व्याजदर ठरेल.
जास्त शिल्लक ठेवल्यास जास्त व्याज मिळणार, त्यामुळे ग्राहकांना बचतीसाठी प्रोत्साहन मिळेल.
क्रेडिट कार्डवरील फायदे बंद:
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फर्स्ट बँकने क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक, वाउचर आणि रिवॉर्ड्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड फायदे 18 एप्रिलपासून बदलू शकतात.
नवीन नियमांमुळे ग्राहकांना काय करावे लागेल?
ATM व्यवहारांची मर्यादा लक्षात ठेवावी आणि अनावश्यक शुल्क टाळावे.
डिजिटल बँकिंगसाठी OTP आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी तयारी ठेवावी.
बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवा अन्यथा दंड भरावा लागू शकतो.
चेक व्यवहार करताना आवश्यक माहिती आधीच बँकेला कळवा.
क्रेडिट कार्डवरील फायदे बंद होणार असल्याने पर्यायी योजना शोधा.