
सोलापूर : सोलापूर–गोवा विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतरही माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी (Ranjitsinh Mohite Patil and Dhairyasheel Mohite Patil, Solapur) प्रमुख सोहळा सुरू होण्यापूर्वीच व्यासपीठ सोडून कार्यक्रमातून काढता पाय घेतलाय. दोन्ही मोहिते पाटील बंधू अचानक निघून गेल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
जयकुमार गोरेंनी या बंधूंचा उल्लेखच केला नाही…
दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोघाचा नामोल्लेख टाळला. विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. तर यंदाच्या निवडणुकीत ते धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ दिली. माळशीरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांवर अनेकवेळा गंभीर आरोप केले.परंतु भाजपकडून आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही परंतु असे का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय?