इन पब्लिक न्यूज :
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत विरोधकांकडून “डेड इकॉनॉमी”सारख्या टीका केल्या जात असताना, अवघ्या 72 तासांत भारतात झालेल्या अब्जावधी डॉलरच्या गुंतवणूक घोषणांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जागतिक महासत्ता, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भारतावर दाखवलेला विश्वास हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा स्पष्ट पुरावा मानला जात आहे.
🔹 कुडनकुलम येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प
रशियाने तब्बल 7.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून तमिळनाडूतील कुडनकुलम येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प ऐतिहासिक ठरणार असून भारताच्या दीर्घकालीन वीज गरजांसाठी तो मैलाचा दगड ठरणार आहे.
🔹 दक्षिण कोरियाची HD Hyundai भारतात दाखल
दक्षिण कोरियाची नामांकित जहाजबांधणी कंपनी एचडी ह्युंदाई (HD Hyundai) हिने भारतात आपले पहिले शिपयार्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला 2.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत ही गुंतवणूक 20 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला यामुळे मोठे बळ मिळणार आहे.
🔹 टेक क्षेत्रातील दिग्गजांची अब्जावधी डॉलरची घोषणा
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनीही भारतावर आपला विश्वास ठसठशीतपणे दाखवला आहे.
- Google ने भारतात 14 अब्ज डॉलर गुंतवणुकीची अधिकृत घोषणा केली.
- त्यानंतर लगेचच Microsoft नेही 17.5 अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधले.
- ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज Amazon ने तर थेट 35 अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा करून खळबळ उडवली आहे.
🔹 Apple चे भारतातील पाचवे रिटेल स्टोअर
आजच, अवघ्या तासभरापूर्वी, Apple ने भारतातील आपले पाचवे रिटेल स्टोअर नोएडा येथील मॉल ऑफ इंडियामध्ये सुरू केले आहे. विशेष म्हणजे या स्टोअरचे मासिक भाडे ₹45.3 लाख असल्याची माहिती समोर आली आहे. भारत हा Apple साठी केवळ बाजारपेठ नाही तर दीर्घकालीन गुंतवणुकीचे केंद्र बनत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
📊 ‘डेड इकॉनॉमी’ की ‘डायनॅमिक इंडिया’?
जर इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुंतवणुकीनंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला “डेड” म्हटले जात असेल, तर अनेक नागरिकांचा सवाल आहे की, मग आधीची तथाकथित “वायझेड इकॉनॉमी” नेमकी काय होती?
आजची अर्थव्यवस्था ही अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीला आकर्षित करणारी, रोजगार निर्माण करणारी आणि जागतिक विश्वास संपादन करणारी असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
