महाराष्ट्रसांगोला

बिग ब्रेकिंग : सांगोला शहराला तब्बल २ वेळा भूकंपाचे हादरे!


सांगोला/महेश लांडगे : सांगोला शहरात दुपारी २ आणि ४ सुमारास तब्बल दोन वेळा प्रचंड मोठा आवाज झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार दोन वेळा भूकंपाचे हादरे बसल्याचे समोर आले आहे. या भूकंपाच्या हादऱ्याने यावेळी शहरातील घरे दुकाने हादरले.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला शहरात दुपारी २ आणि ४ च्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्याने संपूर्ण शहर हादरले असून याचा प्रचंड मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण शहरात पसरला. या धक्कामधून शहरातील घरे, साहित्य तसेच दुकाने व कार्यालय सुद्धा हादरले.

वाहतूक नियम कडक! नियम तोडल्यास होणार इतका दंड


इन पब्लिक न्यूजशी बोलताना सुधीर गवळी म्हणाले, अचानक पणे प्रचंड मोठा आवाज झाला. यानंतर तात्काळ नगरपालिकेतील कर्मचारी, पंचायत समिती यांच्याकडे चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाला या प्रचंड मोठ्या आवाजाची माहिती दिली आहे. याची तात्काळ चौकशी करावी अशी विनंती केली आहे, असे मुख्याधिकारी यांनी संगितले.

-सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला

सांगोला तहसील कार्यालय येथे शहरातील खान परिसरातील नागरिकांनी तसेच खाणच्या मालकांनी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली व त्यांना सांगितले की आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं स्फोट करण्यात आला नाही. परंतु हा आवाज नक्की कशाचा आहे याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

-संतोष कणसे, तहसीलदार सांगोला


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button