मला हलक्यात घेऊ नका; हिंमत असेल तर समोर या : अक्षरा सिंहचे पाहा काय आहे नेमकं प्रकरण…

मुंबई : भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या धमाकेदार गाण्यांसाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. अक्षरा सिंहने 2010 मध्ये ‘सत्यमेव जयते’ या भोजपुरी चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने रवी किशन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.
खरं तर, अक्षरा सिंह पवन सिंह एका कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात सर्व काही ठीक चालले होते, पण अचानक काही लोकांनी मागून इशारे करायला सुरुवात केली. हे पाहताच अक्षरा सिंह यांचा पारा चढला, पण या वेळी अक्षरा सिंह गप्प बसली नाही. अक्षरा सिंहने केवळ प्रत्युत्तरच दिले नाही, तर जोरदार शिव्याही दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पुढे टी म्हणाली, जर हिंमत असेल तर समोर या छाती घेऊन, अक्षरा सिंहला हलक्यात घेऊ नका. उगाचच या शेरनीचे नाव गाजत नाहीये. इकडे या, समोर या, समोर… मागे तर कुत्रे भुंकून निघून जातात. म्हणून मी तुमची गणना कुत्र्यांमध्येच करेन, चला…’
नेमकं काय आहे प्रकरण?
अक्षरा सिंह कार्यक्रमादरम्यान लोकांनी अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी तिला अश्लील इशारेही केले. त्यामुळे अक्षरा सिंह रागाने लाल झाली आणि माईक हातात घेऊन तिने त्या लोकांना मंचावरून फटकारले.