अक्षरा सिंहची संपत्ती ऐकून बसेल धक्का! अभिनय,गायनासोबत या मार्गांनीही करते जबरदस्त कमाई

मनोरंजन डेस्क : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अक्षरा सिंह ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्कृष्ट गायिकाही आहे. तिचं नाव आज भोजपुरीतील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतलं जातं. केवळ पडद्यावरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही तिचं राज्य आहे.
अभिनयाची दमदार सुरुवात
अक्षरा सिंहने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत भोजपुरी सुपरस्टार रवि किशन होते. त्यानंतर तिने ‘प्राण जाये पर वचन ना जाये’, ‘ए बलमा बिहार वाला’, आणि ‘मां तुझे सलाम’ सारख्या अनेक हिट चित्रपटांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
गायन, स्टेज शो आणि ब्रँड प्रमोशनमधून कमाई
अभिनयासोबतच अक्षराची गायकीही प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक गाणी मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवतात. ती थेट स्टेज शो, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरील प्रमोशन यांतूनही मोठ्या प्रमाणावर कमाई करते.
एवढी आहे संपत्ती!
मिळालेल्या अहवालांनुसार, अक्षरा सिंहची एकूण संपत्ती सुमारे ५० ते ५५ कोटी रुपये इतकी आहे. जरी याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी तिच्या जीवनशैलीवरून आणि कामाच्या प्रमाणावरून हे सहज लक्षात येते की ती कोट्यवधींची मालकिण आहे.
स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवले यश
अक्षराने आजवर खेसारी लाल यादव, पवन सिंह आणि निरहुआ (दिनेश लाल यादव) यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. पण विशेष बाब म्हणजे, तिने कधीच कोणाच्या नावाच्या आधारावर नाही, तर स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे.
अक्षरा सिंह ही आजच्या घडीला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे. अभिनय, गायन, मेहनत आणि आत्मविश्वास यांचं अचूक उदाहरण!