
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख वआमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतले दर्शन
सांगोला/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भूषण होते. त्यांनी आपल्या आयुष्यात समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अखंड संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजात समता, बंधुता आणि स्वाभिमानाची भावना बळावली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
ते जवळा (ता. सांगोला) येथील जुन्या राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना बोलत होते.
यावेळी माजी सभापती साहेबराव देशमुख, जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे, ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार साळुंखे पाटील म्हणाले, “डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. ज्यांनी एकेकाळी वेशीबाहेर जीवन काढलं, ते आज गावकुसात आत्मसन्मानाने जीवन जगत आहेत, हे डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे फळ आहे.”
यावेळी त्यांनी सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार बाबासाहेब देशमुख, निवृत्त पोलीस अधिकारी भरत शेळके यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते.
सांगोला तालुक्याशी बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगोला तालुक्यातील लोकांशी अत्यंत जवळचे संबंध होते. बलवडी येथील लिगाडे सरकार कुटुंब आणि कोळा गावातील नागरिकांशी त्यांचे स्नेहसंबंध होते.
त्यामुळे कोळा येथे त्यांच्या अस्थीकलशाचे पूजन करून त्यांचा वारसा जतन करण्यात आला आहे. आजही या प्रेरणास्थळाला भेट देणाऱ्या अनेकांना सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची प्रेरणा मिळते.