सांगोल्यात आज ऐतिहासिक क्षण, याचे आपण साक्षीदार होवूया : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून आपण ही एक भाग व्हावा

इन पब्लिक न्यूज/विशेष वृत्त : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमनानिमित्त सांगोल्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभाग घेतला आणि जयभीमच्या घोषणांनी सांगोला नगरी दुमदुमून गेली.

इन पब्लिक न्यूजशी बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले,सांगोला शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. आपल्या सांगोला मतदारसंघांमध्ये अत्यंत आनंदाची बाब आहे. ज्यांनी समता, बंधुता,समानता व न्याय संविधानाच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना तसेच गोरगरीब वंचित लोकांना देण्याचं काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आज या महामानवाच्या पुतळ्याचे अनावरण सांगोला नगरीमध्ये होत आहे. समस्त तालुक्यातील तमाम जनतेला मी आव्हान करतो की, या पुतळ्याचे दुपारी ५.०० वाजता अनावरण होणार आहे, तरी सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून आपण ही एक भाग व्हावा असे डॉ. बाबासाहेब देशमुख इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, सांगोला पोलीस ठाण्याला तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हा पूर्ण सोहळा आनंदमय वातावरणात साजरा होण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची बारकाईने पाहणी करत सर्व शहरात पोलीस अधिकारी हे संपूर्ण मिरवणुकी दरम्यान उपस्थित राहण्यास आम्ही त्यान सूचना दिल्या आहेत असे असे डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले.