
Dr. Babasaheb Deshmukh
मुंबई : सांगोला विधानसभा मतदारसंघातील (Assembly Monsoon Session) शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरी विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागण्यांना राज्य शासनाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात (Assembly Monsoon Session) मांडलेल्या विविध मागण्यांसाठी शासनाने प्रचंड निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असून मतदारसंघात अनेक ठिकाणी विकासकामांना चालना मिळणार आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात(Assembly Monsoon Session) राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान देण्याची जोरदार मागणी केली होती. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातून थेट फायदा मिळावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ही मागणी करण्यात आली होती. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सांगोला तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पावसाळ्यात ग्रामीण भागातील विस्कळीत होणारे दळणवळण यावरही आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले. त्यांनी पुरवणी मागणीतून निधीची मागणी केली होती. शासनाने यावरही मान्यता देत रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे तालुक्यातील गावांमध्ये संपर्क मार्ग सुधारेल आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होईल.(Assembly Monsoon Session)
सांगोला तालुक्यात डाळिंब आणि द्राक्ष हे महत्वाचे नगदी पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना या पिकांपासून जास्त उत्पन्न मिळावे यासाठी या भागात वाईन उद्योग सुरू करण्याची (Assembly Monsoon Session) मागणीही आमदार देशमुख यांनी केली होती. शासनाने या मागणीवर सकारात्मकता दर्शवून त्यासाठीही निधीची तरतूद केली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.
सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याची ओळखच ‘डाळिंबाचा जिल्हा’ म्हणून आहे. येथे २००५ पासून कार्यरत असलेले केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र आजतागायत नवीन वाण निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. या केंद्रातील बीज परीक्षण प्रयोगशाळेचे बळकटीकरण करण्यासाठी आमदार देशमुख यांनी निधीची मागणी केली होती. शासनाने याला मान्यता देत लवकरच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सांगोला शहरात सध्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही आमदार देशमुख यांनी निधीची मागणी केली होती. शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये यालाही मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना येणाऱ्या समस्यांवर तोडगा निघणार आहे.
सांगोला येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सध्या भाडे तत्वावर सुरू आहे. या ठिकाणी शासकीय इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध असून प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी आमदार देशमुख यांनी केलेल्या मागणीला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे सरकारी कामकाज अधिक सोयीचे आणि प्रभावी होईल.
सांगोला ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत यासाठीही निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने या मागण्यांनाही मान्यता दिली असून रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.(Assembly Monsoon Session)