मी आणलं, मी आणलं, मी आणलं; अर्रर्रर्रsss जनतेने नक्की ऐकावं तर कुणाचं अनं विश्वास ठेवावा तर कुणावर?
तालुक्यात नक्कीच चालले तरी काय?

विशेष वृत्त : सांगोला शहरात, तालुक्यात गेल्या विधानसभेनंतर एकाच कामाची तालुक्यामध्ये अनेक नवे जुने युवा नेते आपापल्या परीने जाहिरातबाजीचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक नेता,पुढारी म्हणतोय हे काम मीच केल माझ्या प्रयत्न होता मी या मंत्र्यांना तर त्या खासदाराला सागितलं आणि पुन्हा जाहिरात, व्हिडीओची तालुक्यात गर्दीच पहायला मिळाली की काय?
शहरात विकास कामांना गती आली परंतु आता कामाचा वेग कमी झालेला दिसून येत आहे? शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दुर्दैवी असून अनेक नागरिक पडून स्वतःचं कंबर्ड मोडून घेत आहेत. याकडे मात्र कोणाचाच लक्ष नाही.
गुपित हे गुपितच आहे का ?
दरम्यान, शहरातील नव्या-जुन्या नेत्यांमध्ये जाहिरात बाजी करण्यात एखादं काम झालं की स्वतःला श्रेय घेण्यात चढाओढ लागली दिसून येत आहे. कॅनल ने पाणी आलं असू द्या शहरातील रस्ते असू द्या वा शहरातील नवीन एसटी बस असू द्या प्रत्येक नेता म्हणतो मी प्रयत्न केले प्रत्येक नेत्याचा स्टेटस पाहावं तर मागणी केलेली दिसते परंतु मंत्रालयातून कुणाच्या मागणीला यश आलं याचं मात्र गुपित हे गुपितच राहिले.
कोण म्हणत मी सत्तेत नसून काम केलं, कोण म्हणत मी सत्तेत असून काम केलं पण जनता म्हणते तुम्ही सत्तेत असा किंवा नसा आम्हाला काही दिल?
भर पावसात आणलं पाणी?
पाहता पाहता अख्खा उन्हाळा गेला परंतु भर पावसात या नेत्यांनी आणलं पाणी कोण म्हणतो. प्रत्येक नेता स्वतःला श्रेय घेण्यात व्यस्त आहे. आज लोकांच्या शेतात अवकाळी पावसामुळे पाणी उभा राहिला आहे. याची पाहणी करायला कोणी जात नाही. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई न देता फक्त आम्ही आणलं आम्ही आणलं आम्ही आणलं करण्यातच हे नेते व्यस्त आहेत.
जनता म्हणाली पुरावा द्या :
इतिहासात सांगोला तालुक्याच्या राजकारणात पहिल्यांदाच श्रेय घेण्यात चढाओढ लागलेली पाहायला मिळत आहे. जनतेने नक्की विश्वास ठेवायचा तरी कोणावर प्रत्येकाने आपापल्या जाहीर सभा घेऊन आपण केलेल्या कामांच्या यादीचा पुरावा द्यावा असे जनतेतून बोलले जात आहे.