पंढरपूर/प्रतिनिधी: वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महापर्व – आषाढी वारीचा सोहळा यंदा जूनमध्ये सुरु होणार असून, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान अनुक्रमे १८ आणि १९ जून रोजी होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी – देहू येथून १८ जूनला प्रस्थान
- १८ जून: देहू येथून प्रस्थान, रात्रीचा मुक्काम – इनामदार वाडा
- १९ जून: मुक्काम – आकुर्डी, विठ्ठल मंदिर
- २० जून: दापोडी, फर्ग्युसन रोड मार्गे नानापेठ, विठ्ठल मंदिर मुक्काम
- २१ जून: मुक्काम – श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे
- २२ जून: लोणी काळभोर
- २३-५ जुलै: यवत, बारामती, अकलूज, वाखरी आदी गावांतून मार्गक्रमण
- ५ जुलै: पंढरपूरमध्ये आगमन
- ६ जुलै: आषाढी एकादशी – चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल दर्शन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी – आळंदी येथून १९ जूनला प्रस्थान
- १९ जून (रात्री ८ वा.): प्रस्थान – आळंदी, मुक्काम – गांधीवाडा
- २० जून: संगमवाडी विसावा, मुक्काम – भवानी पेठ
- २१ जून: पुण्यात मुक्काम
- २२-२४ जून: सासवड व जेजुरी मुक्काम
- २५ जून – ५ जुलै: फलटण, माळशिरस, वाखरी मार्गे प्रवास
- ५ जुलै: पंढरपूरमध्ये आगमन
- ६ जुलै: आषाढी एकादशी – नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
- १० जुलैपर्यंत पालखी पंढरपुरात राहील
वारीसाठी प्रशासन सज्ज
प्रशासनाने वारी सोहळ्यासाठी तयारी सुरु केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे.
