सांगोला : सांगोला तालुक्यातील चोपडी येथील आशा सचिन बाबर यांनी एम. एससी. बी. एड सह भौतिकशास्त्र विषयातून सेट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूर तालुक्यात झाले. त्यानंतर विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण सांगोला विद्यामंदिर येथे झाले. भौतिकशास्त्र विषयातून बी.एससी. चे महाविद्यालयीन शिक्षण आटपाडी येथे पूर्ण केले.
श्रीमती काशीबाई नवले कॉलेज कमलापूर येथे बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम. एससी चे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पूर्ण केले. शिक्षक अभियोग्यता परीक्षेतही त्या (Tait) यशस्वी झाल्या आहेत.
भौतिकशास्त्र विषयातून राज्य पात्रता परीक्षेत (Set) मोठे संपादन केले आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनाचा दोन वर्षाचा अनुभव आहे. सध्या त्या आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात जुनिअर कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. आशा सचिन बाबर यांनी एम .एस. सी. बी. एड सेट परीक्षेसह विविध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे चोपडीसह तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
