मनोरंजन

अर्रर्रर्रर्रर्र ! निक्की -अरबाजचा रोमान्स अनं… हा फोटो पहिला तर व्हाल थक्क!


मुंबई / प्रतिनिधी: अभिनेत्री निक्की तांबोळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ती नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईल आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

यावेळी तिने बॉयफ्रेंड आणि अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबतचे १० खास फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

या फोटोंमध्ये निक्की काळ्या ड्रेसमध्ये झळकत असून, तिचा लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. “Lyrics says it all” असं खास कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, तिसरा आणि सहावा फोटो विशेष गाजत आहेत.

निक्की आणि अरबाजचे नाते बिग बॉस मराठीच्या एका सिझनदरम्यान सुरू झाले होते. दोघांमधील सुसंवाद आणि केमिस्ट्री तेव्हापासून चाहत्यांच्या नजरेत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, निक्कीसोबतचं नातं सुरू होण्यापूर्वी अरबाज पटेल लीजा बिंद्रा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांच्या साखरपुडा पार पडल्याचीही माहिती आहे.

मात्र, बिग बॉस नंतर अरबाज आणि लीजाचं नातं संपुष्टात आलं असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. निक्की तांबोळीचा आत्मविश्वासपूर्ण अंदाज आणि

सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हनेस यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या या नव्या पोस्टने पुन्हा एकदा तिचं नाव ट्रेंडमध्ये आणलं आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button