समुद्रकिनारी अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस लूक; चाहते म्हणाले ‘फायर’

मुंबई / प्रतिनिधी: अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते. नुकतंच तिने समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केलं असून, त्यातील काही निवडक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये अंकिता ऑरेंज रंगाच्या आउटफिटमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पोझ करताना दिसत आहे. फोटोमधील तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ओशन ब्लू पार्श्वभूमी आणि तिच्या पेहरावातील रंगसंगतीने या फोटोना अधिक आकर्षक बनवलं आहे.

या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत असून, अनेकांनी “गॉर्जियस”, “फायर” अशा शब्दांत तिचं कौतुक केलं आहे.

काहींनी तर हा लूक तिच्या आजवरच्या सर्वात स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक्सपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.

अंकिता लोखंडे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून, सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांशी नियमितपणे संवाद साधत असते.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983