अल्लू अर्जुनच्या चित्रपटात “ही’ बॉलिवूड अभिनेत्री झळकणार! तिने केली १०० कोटीची मागणी!
जान्हवी कपूरही या चित्रपटाचा भाग असणार आहे

इन पब्लिक न्यूज : अल्लू अर्जुन नुकताच ‘पुष्पा-2’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता बऱ्याच दिवसांपासून अफवा आहेत की, अभिनेता लवकरच ॲटलीच्या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्रीला घेण्याचा विचार केला जात आहे. अलीकडेच ही अभिनेत्री ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटात दिसली होती. जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री. चित्रपट निर्माते आणि अभिनेत्याने अद्याप त्यांच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. आता अफवा आहे की, जान्हवी कपूरही या चित्रपटाचा भाग असणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अल्लू अर्जुनच्या दिग्दर्शकांसोबतच्या भेटीच्या बातम्याही समोर येत आहेत. या चित्रपटात पाच अभिनेत्री दिसणार असल्याचे बोलले जात होते. या चित्रपटासाठी कास्टिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. दिग्दर्शक ॲक्शन एंटरटेनरमध्ये जान्हवी कपूरला मुख्य अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेण्याचा विचार करत आहेत.
काय ते नवच ! वॅलेंटाईन डेसाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक..!
ॲटलीने मागितली एवढे मानधन :
ॲटलीने अल्लू अर्जुनसोबत चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी मोठे मानधन मागितली आहे. एका वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात पाच अभिनेत्री दिसू शकतात. या चित्रपटात कोरिया आणि अमेरिकेतील अभिनेत्रींचीही एन्ट्री होऊ शकते, असे बोलले जात आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. ॲटलीने या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ॲटली ‘जवान’ आणि ‘बेबी जॉन’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात.