मनोरंजन

आलिया भट्टचा मराठमोळा लुक! ६ लाखांचे कानातले, नऊवारी पैठणी, अन नथीचा मुखडा…!


मनोरंजन विशेष :  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे तिचा पारंपरिक मराठमोळा लुक! नुकत्याच पार पडलेल्या वेव्ज फॅशन इव्हेंटमध्ये आलियाने नऊवारी पैठणी आणि लाखो रुपये किमतीचे दागिने घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या लुकचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

तीन रंगांची खास पैठणी

आलियाने नेसलेली नऊवारी सेलिब्रिटी डिझायनर डिझाईन केली होती. पीच, केशरी आणि गुलाबी अशा रंगछटांनी सजलेली ही पैठणी फुलाफुलांच्या नक्षीने खुललेली होती. पारंपरिक काठपदराऐवजी आलियाने मॉडर्न टच देत स्लिव्हलेस कुंदन वर्क असलेला बेबी पिंक ब्लाऊज परिधान केला होता.

६ लाखांचे पाचू-हिरा जडित कानातले

या लुकमध्ये सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते  खास पाचू, मोती आणि हिरे घडवलेले कानातले  ज्यांची किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे! याशिवाय, हिरवी टिकली, मधोमध भांग आणि घट्ट आंबाडा, पैठणीला साजेसा केशरी-गुलाबी शेला या सगळ्यांनी आलियाचा लुक परिपूर्ण झाला.

मराठी सौंदर्याची अलिया स्टाईल!

मराठी पोशाख, दागिने आणि केसांची रचना  आलियाने मराठी लुकची आधुनिक परिभाषा सादर केली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्या लुकचं भरभरून कौतुक केलं आहे. काही युजर्सनी तर म्हटलंय, “मराठी मुलगीच वाटतेय!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button