महाराष्ट्रसांगोला

ॲड. अक्षयदादा तानाजी बनसोडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा!

“इन पब्लिक न्यूज”च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


सांगोला/महेश लांडगे : ॲड. अक्षयदादा बनसोडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ६मार्च रोजी सायं.७ वा.उत्साहात संपन्न होणार आहे.

सांगोला येथील दीक्षाभूमी कट्टा भीमनगर येथे ॲड. अक्षयदादा बनसोडेयांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, या सोहळ्याला विविध क्षेत्रातील  मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

“अक्षय दादा आपण ज्या वाटेवर चाललाय त्यामध्ये तर यश हे नक्कीच भेटेल! तुम्ही नेहमी धाडसाने पुढेच जात राहा! तुझं जीवन आनंदात आणि यशस्वी होवो!”

 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिनदादा सावंत (माजी नगरसेवक महानगरपालिका सांगली) आणि आंबेडकरवादी प्रभावक भिमकन्यादिव्याताई शिंदे (सरकार) (Ambedkarite Influencer) उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक उपक्रम:

ॲड. अक्षयदादा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता.

  • भीमनगर जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप.
  • मुकबधिर शाळा आणि वृद्धाश्रमात भोजनदान.
  • सांगोला शहरातील उद्यानांमध्ये वृक्षारोपण.
  • गुरुदत्त मेन्स पार्लरमध्ये दिवसभर मोफत सेवा.
  • बुरांडे पिठाची गिरणी दिवसभर मोफत.
  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड पेपरसाठी पेन वाटप.
  • सांगोला शहरातील नागरिकांसाठी पाच रिक्षा दिवसभर मोफत.

आयोजक:

या कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button