देश- विदेश

Ahmedabad Plane Crash: मृत्यूला हरवत एका प्रवाशाने वाचवले प्राण, विमानातून उडी घेऊन केले जीवाचे रक्षण

Ahmedabad Plane Crash


Ahmedabad Plane Crash:  अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या बोईंग-787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. (Ahmedabad Plane Crash) या दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याच अपघातात एक व्यक्ती असा होता ज्याने मृत्यूच्या दाढेतून स्वतःचे प्राण वाचवले आहेत.

विमानाच्या सीट नंबर 11-A वर बसलेले भारतीय मूळाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे या अपघातातून जिवंत बचावले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दुपारी 1.39 वाजता विमानाने घेतली होती झेप

DGCA (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) कडून विमान अपघाताबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. १२ जून २०२५ रोजी (Ahmedabad Plane Crash) एअर इंडिया फ्लाइट AI-171 अहमदाबादहून गॅटविक (ब्रिटन) कडे निघाली होती. हे B787 विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कोसळले.(Ahmedabad Plane Crash)

या विमानात एकूण २४२ प्रवासी होते,(Ahmedabad Plane Crash) त्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. हे विमान कॅप्टन सुमित साभरवाल चालवत होते, (Ahmedabad Plane Crash) तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर त्यांच्यासोबत होते. साभरवाल यांना 8200 तासांचे उड्डाण अनुभव होता, तर कुंदर यांना 1100 तासांचा अनुभव होता.(Ahmedabad Plane Crash)

MAYDAY कॉलनंतर संपर्क तुटला

महत्त्वाची माहिती म्हणजे हे (Ahmedabad Plane Crash) विमान अहमदाबाद विमानतळाच्या रनवे 23 वरून दुपारी 1.39 वाजता झेपावले, त्यानंतर लगेचच त्यांनी MAYDAY कॉल नोंदवला. मात्र त्यानंतर विमानाकडून कोणताही संपर्क झाला नाही. काही सेकंदांनंतरच हे विमान विमानतळ परिसराच्या बाहेर कोसळले.(Ahmedabad Plane Crash)

ही दुर्घटना अत्यंत गंभीर असून (Ahmedabad Plane Crash) एकाचवेळी अनेकांचे प्राण जाण्याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरले आहे. सध्या बचावकार्य आणि तपास सुरू आहे.(Ahmedabad Plane Crash)


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button