चुलत दिराशी अफेअर, पतीची हत्या आणि अपघाताचा बनाव; थरकाप उडवणारी घटना उघड

कोल्हापूर / प्रतिनिधी : पतीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीने चुलत दिर व प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना वडगाव परिसरात उघडकीस आली आहे. नंतर मृतदेह रस्त्यालगत टाकून अपघाती मृत्यूचा देखावा रचण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , खून झालेल्या शेतकऱ्याचे वय ४७, रा. वडगाव याप्रकरणी त्यांच्या शेतकऱ्याचा आईने मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर व चुलत दिरास अटक केली आहे.
शेतकऱ्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत होती. खुनाचा दुसऱ्या दिवशी सकाळी काशी नाका वडगाव – माद्याळ रस्ता येथे शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या.
शेतकऱ्याने स्थानिक महिलांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी वरून पती-पत्नी मध्ये वाद सुरु होते. त्यातून रागाच्या भरात पत्नीने आपल्या प्रियकर व चुलत दिराच्या मदतीने पतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने वार करत हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत टाकून ही बाब अपघात असल्याचा बनाव रचला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिसांना कडून पुढील तपास सुरु आहे.