
Deputy CM Eknath Shinde , Adv Shahajibapu patil
सांगोला/रोहित हेगडे : सांगोल्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी विधानसभा पार पडली. या विधानसभेमध्ये मा. आमदार ॲड. शहाजी बापू पाटील यांचा अल्प मताने पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर आमदार ॲड. शहाजी बापू पाटील हे विकासाच्या कामांसाठी कुठेही थांबलेले दिसून येत नाहीत.

दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना अंतर्गत सांगोला तालुक्यात ३०० कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी २२ गावांसाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच सांगोला शहर व तालुक्यातील विविध विकासकामांसाठी त्यांचे सातत्य सुरूच आहे.
विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो : अजित पवार
सध्या विधानसभा पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्यात ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारीबाबत जोरदार मागणी होत आहे. त्यांच्या समर्थकांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच इतर मंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी विनंती करणार आहे.
सांगोला पुन्हा गुलालाने माखणार?
तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “बापू पुन्हा यावेत!” अशी मागणी सांगोल्यात जोर धरत आहे. बापूंना संधी मिळाली तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी सज्ज आहेत.
“बापू पुन्हा आमदार झाले तर सांगोल्याच्या विकासाला आणखी गती मिळेल,” असा विश्वास स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आता उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागले आहे.