राजकीयमहाराष्ट्र

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते : किशोर तिवारी


मुंबई/सहदेव खांडेकर : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा शिंदे गटाचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. 

आम्ही प्रयत्न केला नसता, तर अटक झाली असती:  किशोर तिवारी

किशोर तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते, असा दावा केला. त्यांनी असेही सांगितले की,”जेव्हा आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, तेव्हा ते दिशा सालियनच्या घरी गेले होते. तिथे पार्टी झाली आणि त्यानंतर दिशा सालियनने आत्महत्या केली.

सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?

दिशा सालियन प्रकरण आणि आदित्य ठाकरेंवर आरोप

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. मात्र, तिचा खून झाला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता आणि त्यात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा काही राजकीय नेत्यांनी केला होता.

राजकीय वातावरण तापले

आता किशोर तिवारी यांच्या या नव्या दाव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ठाकरे गटाने या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी लवकरच नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button