“या”अभिनेत्रीचे फोटोज पॉर्न साईटवर लीक,केला आत्महत्येचा विचार?

मुंबई / प्रतिनिधी: आपल्या अतरंगी फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या बालपणातील एक अत्यंत धक्कादायक आणि भावनिक अनुभव शेअर केला. केवळ १५ वर्षांची असताना तिचे काही फोटोज अज्ञात व्यक्तीकडून एका पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती तिने दिली.
उर्फीने सांगितले की, त्या घटनेनंतर तिला मानसिकदृष्ट्या मोठा आघात बसला होता. आत्महत्येचे विचारही मनात यायला लागले होते. तिचे वडील खूप कडक शिस्तीचे होते आणि या प्रकरणामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. उर्फीने सांगितले की, वडिलांच्या भीतीमुळे तिला अनेकदा मारहाण सहन करावी लागली.
“तेव्हा मी लखनऊमध्ये राहत होते आणि एकदा ट्यूब टॉप घातला होता. त्या काळात अशा प्रकारचे कपडे घालणे खूप मोठी गोष्ट मानली जायची,” असे उर्फीने सांगितले. याच दरम्यान तिचे फोटोज इंटरनेटवर लीक झाले. विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नव्हती.
उर्फी म्हणते, मारहाण म्हणजे खरंच मारहाण. फक्त एक-दोन चापट नव्हे. मी इतकी मार खाल्ली होती की, एकदा तर मी बेशुद्ध झाले.
या अनुभवांमुळे उर्फीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, मात्र तरीही तिने हार मानली नाही. आज ती स्वतःच्या शैलीसाठी ओळखली जाते आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983