वडिलांच्या मारहाणीने त्रस्त होऊन सातवीतल्या मुलीने केली आत्महत्या

सोलापूर/प्रतिनिधी: वडिलांच्या सततच्या मारहाणी आणि शिवीगाळीने त्रस्त होऊन सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडली.
सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने घरी कोणी नसताना आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तिचा आईने माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत.
त्यांच्या मते, वडील मुलीला वारंवार मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून मुलगी काही काळासाठी आजीच्या घरी राहायला गेली होती.
मात्र वडिलांनी तिला फोन करून धमकावले, “आता ताबडतोब घरी ये, नाहीतर मी गळफास घेईन,” अशी धमकी दिल्याने घाबरून मुलगी घरी परतली. घरी आल्यावर वडिलांनी पुन्हा मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर वडील घरातून निघून गेले आणि मुलीचा आईही बाजारात गेली. घरात एकटी असताना मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.
या प्रकरणाचा तपास सध्या सदर बझार पोलीस करत असून, आईने केलेल्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.