WhatsApp ‘हे’ फिचर सर्वात जास्त खतरनाक? एक क्लिक अनं थेट बँक खाते रिकामे!

विशेष वृत्त : आजकाल WhatsAppवर एक नवीन धोकादायक फिचर समोर आले आहे. ज्याला ब्लर इमेज स्कॅम असे म्हणतात. हा घोटाळा लोकांना फसवण्यासाठी वापरला जातो. ज्यामध्ये तुमच्या भावना आणि कुतूहलाचा फायदा घेतात. तुमच्या WhatsApp वर एक अस्पष्ट प्रतिमा दिसली की संपूर्ण खेळ सुरू होतो. जेव्हा तुमचा फोन हॅक होतो किंवा तुमचे बँक खाते रिकामे होते तेव्हाच ते संपते. त्याचे बळी होण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
ब्लर इमेज स्कॅम कसा काम करतो ?
या घोटाळ्यात, तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून WhatsAppवर एक अस्पष्ट फोटो पाठवला जातो. त्या फोटोमध्ये अशी कॅप्शन दिली आहे जी तो फोटो पाहण्याची उत्सुकता वाढवते. या फोटोत तुम्ही आहात का? बघ, मला तुझा जुना फोटो सापडला आहे! क्लिक करा आणि पहा कोण आहे ते? अशी ओळ वाचल्यानंतर, तुम्ही त्या फोटोवर क्लिक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.
तुमचा हा एक क्लिक तुम्हाला दिवाळखोर बनवू शकतो. जेव्हा तुम्ही फोटोवर क्लिक करता किंवा फोटो उघडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला एका लिंकवर पुनर्निर्देशित केले जाते. ही लिंक एका बनावट वेबसाइटवर घेऊन जाते, जिथे तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील, OTP किंवा बँक तपशील विचारले जातात. यांनतर तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. यापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.