हॅलो साहेब मी पत्नीचा खून केला आहे; पतीचा पोलीस ठाण्यात फोन

उत्तरप्रदेश/प्रतिनिधी : घरगुती वादातून पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिल्याची धक्कादायक घटना हापूर शहरातील रफिक नगरमध्ये घडली आहे. आरोपी पती रशीद अली याला पोलिसांनी अटक केली असून, मृत पत्नी नाजमीन हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशीद अली आणि नाजमीन यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या तीन मुले असून, मोठ्या मुलाचे वय ९ वर्ष आहे. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत, विशेषतः नाजमीन तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह धरायची, ज्यावरून रशीद अली नाराज असे.
१७ एप्रिल रोजी गुरुवारी रात्री उशिरा दोघांमध्ये तीव्र वाद झाला, आणि रागाच्या भरात रशीदने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास रशीद अलीने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करून म्हणाले, हॅलो सर, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मला अटक करा.
या माहितीवर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी नाजमीनचा मृतदेह कब्जात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हापूर पोलीस करत आहेत.