पंढरपूर सिंहगड मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागात चर्चासत्र
विद्यार्थ्यांसाठी सांख्यिकी विश्लेषण आणि रिग्रेशन एनालिसिसचे सखोल मार्गदर्शन

पंढरपूर/हेमा हिरासकर : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथे दिनांक 7 मार्च 2025 रोजी एप्लीकेशन ऑफ एस. पी. एस. एस. सॉफ्टवेअर वर चर्चासत्र आयोजित केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये ओमकार बिडकर यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रशिक्षण दिले.
सिंहगड कॉलेज महाविद्यालयाचा खेडभाळवणीत श्रमसंस्कार शिबीराचा समारोप
या कार्यशाळेमध्ये एस. पी. एस. एस. सॉफ्टवेअरची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उपविभागात सांख्यिकीचा कसा वापर होतो हे सांगितले. विद्यार्थ्यांकडून हँड्स ऑन एक्सपिरीयन्स करून घेण्यात आले.
या चर्चासत्रामध्ये रिग्रेशन एनालिसिस चा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये होत असलेला उपयोग आणि महत्त्व समजावून सांगितले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांख्यिकी चाचणीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. रचना, वाहतूक आणि पर्यावरण उपविभागात संशोधनामध्ये सांख्यिकी विश्लेषणाचा उपयोग कसा होतो आणि त्यांचे महत्त्व पटवून दिले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.