
सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनिअर कॉलेज या संस्थेमध्ये शिक्षकांमध्येच नेहमीच धूसपूस सुरू असते. एकमेकांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे असे प्रकार तर नित्यनियमांचे आहेत. यावर संस्थापक, सचिव व इतर संस्थेतील सदस्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. दरम्यान हे असले प्रकार यांना माहीत असून देखील ते झोपलेले आहेत का? असा सवाल पालकांनी केला आहे.
अर्रर्र..”हे” तर रोजच आहे, विद्यार्थी म्हणाले…
तसेच, या शैक्षणिक संस्थेत असे होणारे प्रकार हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींवर परिणाम करतात. शिकण्यासाठी आणि स्वतःचे करिअर करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना असे प्रकार तर नेहमीच पहावयास मिळतात. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याची नुकसान भरपाई संस्थाचालक व इतर सदस्य देणार का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे?
“तेरी भी चुप मेरी भी चुप” ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेमध्ये शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून दुर्दैवी प्रकार म्हणजे काळे फासण्याचे प्रकार झाले आहेत. या प्रकारावर “तेरी भी चुप मेरी भी चुप”असे प्रकार होत आहेत, असे काही लोकांनी स्टेट्स ठेवले होते.
दरम्यान, काळे फासून आणि तुंबळ हाणामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होताना समोर आले आहे. शैक्षणिक संस्थेत लाजीरवाणा प्रकार झाला असून संस्थापक मात्र दमदाटी,धमक्या, शिवीगाळ आणि अश्या प्रकाराला पाठीशी घालण्यात व्यस्त आहेत. तर अश्या होणाऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून असे का घडते याकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे शिक्षक,प्राध्यापक, व इतर कर्मचाऱ्यानी माहिती दिली.