जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर आयोजित : ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन
ज्या ज्या लोकांनी पुस्तकाची मैत्री केली ती लोक या जगात यशस्वी झाली

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र, जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत सोलापूर येथे ग्रंथोत्सव 2024 चे आज शिवछत्रपती रंगभवन येथे ग्रंथोत्सवाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी श्री अनंत राऊत हे होते. तत्पुर्वी सकाळच्या सत्रात संगमेश्वर पब्लिक स्कूल येथे लेझीम ,टाळमृदंग झांज पथक या पारंपारीक वाद्यांच्या गजरात ग्रंथ दिंडीचे पुजन करुन उपजिल्हा धिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा अधिकारी श्रीमती अजंली मरोड यांच्या हस्ते ग्रंथदिंडी चा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक प्रशालेतील शिक्षक, विद्याार्थी व ग्रंथ प्रेमी उपस्थित होते .
शिवछत्रती रंगभवन येथे ग्रंथोत्सव कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीमती शालिनी इंगोले सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे ,जिल्हा कोषागार अधिकारी रणजित कदम, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय पवार , दै. लोकमतचे निवासी संपादक श्री सचिन जवळकोटे, प्रोफेसर डॉ. शिवाजीराव देशमुख, कार्यवाह साहेबराव शिंदे ग्रंथ मित्र कुंडलिकराव मोरे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच सोलापूर जिल्ह्यामधून सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटना नंतर परिसंवादा मध्ये मान्यवर साहित्यिकांनी आपले अनमोल विचार व्यक्त करून वाचनाने माणूस समृध्द होतो तसेच ग्रंथ, पुस्तक हे माणसाचे मित्र असतात हे सांगितले.
वनवा तसाच आहे पाऊस सरून गेला .
विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला
होता विकास आधी जो दास बंगल्याचा
कित्येक पुस्तकांनी तो झोपडीत नेला.
ज्या ज्या लोकांनी पुस्तकाची मैत्री केली ती लोक या जगात यशस्वी झाली निवडक दर्जेदार पुस्तक वाचली पाहिजे. वाचन हे ताखात सारखे आहे ज्ञान लोण्यासारखे आहे .जसं ताक लोण्यासाठी रुई लावल्याशिवाय मिळत नाही तसं वाचल्यानंतर चिंतनाची रुई लावल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या गोड वाणीतून आपली प्रसिद्ध कविता ऐकवण्यात आली यामध्ये त्यांची गाजलेली कविता दुःख अडवायला उंबर्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेने प्रेक्षकाची मने जिंकली.
तर उदघाटक म्हणून लाभलेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते माननीय देविदास सौदागर यांनी आपल्या भाषणांमधून पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजे दररोज दहा ते पंधरा मिनिट पुस्तके वाचलीच पाहिजे वाचनामुळे संवेदनशील समाज निर्माण होतो व संवेदनशील समाजाची आजची गरज आहे आजच्या भयावान वातावरणात त्याची जास्तच गरज आहे वाचन आजच्या परिस्थितीला उत्तर म्हणून पर्याय असू शकतो.
तर ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये, धर्म जात कधी आडवी नसते भक्तीला, चालत राहावं वाटा पुस्तक असावं सोबतीला. पुस्तक शब्दांच्या मोत्यात गुंफलेला हार वळणाच्या वाटेवर विसाव्याचा आधार. पुस्तक मोरपीस बनवून काळजावर फिरतं , दुःखाच्या जखमेवर हळूच फुंकर मारत. अशा अनमोल विचारांनी सभागृहास साहित्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.
पुस्तक तर वाचलीच पाहिजे परंतु वर्तमानपत्राच्या प्रत्येक कॉलम मधून या समाजामधला वाचक हा वाचण्यात येतो व वाचकाच्या वेदना मनाला भावून जातात.असे विचार सचिन जवळकोटे यांनी व्यक्त केले
या उद्घाटन या कार्यक्रमासया उद्घाटनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले तर आभार श्री प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले. या ग्रंथोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यालयाचे संजय ढेरे, प्रदीप गाडे ,यल्लाप्पा घोडके महेश कुलकर्णी इ.कर्मचारी व ग्रंथ प्रेमींनी परिश्रम घेतले.
या ग्रंथोत्सवा दम्यान ग्रंथप्रेमींसाठी ग्रंथ विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले असून आपल्या आवडीचे ग्रंथ विकत घेण्याची संथी या दोन दिवसात उपलब्ध होणार आहे असे जिल्हा ग्रंथालया मार्फत आवाहन करण्यात आले आहे.
विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो : अजित पवार