देश- विदेशEconomyमहाराष्ट्र

विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो : अजित पवार  

अर्थसंकल्पातील 'या' आहेत १३ मोठ्या घोषणा


मुंबई : Maharashtra Budget 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, अजित पवार यांनी अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण, कला, नोकरी, विज्ञान आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्राची अभिमानाने मान उंचावेल, अशा मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत.

आर्थिक स्थिती आणि महत्त्वाचे मुद्दे:

  • राज्याची महसुली तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे.
  • २०२५-२६ या वर्षासाठी राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी रुपये आहे.
  • महाराष्ट्रात देशी-विदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून, औद्योगिक विकासात राज्य आघाडीवर आहे.
  • जानेवारी २०२५ मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने ६३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
  • भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा १५.४ टक्के वाटा आहे.
  • मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
  • हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे ‘अर्बन हाट केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार आहे.
  • येत्या काळात राज्यात १५ लाख ७२ हजार ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
  • ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती नाही, तेथे ‘एक तालुका-एक बाजार समिती’ योजना राबविण्यात येणार आहे.
  • नवी मुंबईत २५० एकर जागेवर ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे.
  • हवामान बदलामुळे होणाऱ्या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये ८ हजार ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
  • ‘लॉजिस्टिक धोरण-२०२४’ अंतर्गत १० हजार एकरांपेक्षा जास्त जागेवर लॉजिस्टिक सुविधा विकसित करण्यात येणार असून, त्यातून ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
  • रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाद्वारे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून १० हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या अर्थसंकल्पाद्वारे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button