नागरिकांच्या डोळ्यात धुळ! रस्त्यावरील की मुख्याधिकारी यांच्याकडून?
अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन फिरावे यानंतर...

सांगोला : सांगोला शहरात भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शहरातील काही भागात हे काम पूर्ण झाले असून येथील सर्व रस्ते जसेच्या तसेच आहेत. “इन पब्लिक न्यूज”ने याबाबत माहिती समोर आणली असता तात्पुरत्या स्वरूपात पाण्याच्या टँकरचा फिरवला जातो. मात्र यानंतर पूर्वस्थिती जैसे थे! शहरातील प्रचंड प्रमाणात असणारी धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
“इन पब्लिक न्यूज”ने फोटोसह नागरिकांची समस्या जनता,लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आणली. यानंतर मुख्याधिकारी यांनी कामाच्या आढावा याबाबत माहिती प्रसारित केली. तसेच मुख्याधिकारी यांनी जनतेला आव्हान केले की, नागरिकांना जर काही अडीअडचणी असतील तर त्यांनी येऊन भेटावे. परंतु आजतागायत किती नागरिक भेटले? किती नागरिकांचे प्रश्न सोडवले? याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन फिरावे यानंतर खुलासा होईल नक्की अफवा आहे की खरच धुळ ? रस्त्यावरील प्रचंड धूळ नागरिकांच्या डोळ्यात जात आहे यावर मुख्याधिकारी यांच्याकडूनही नागरिकांच्या डोळ्यात अशा प्रकारे धूळ टाकली जात आहे. सांगोलासारख्या शहरात हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची बाब समोर येत आहे, असे नागरिकांनी म्हटले.
सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!
जेष्ठ नागरिक म्हणाले…
“इन पब्लिक न्यूज”शी बोलताना काही जेष्ठ नागरिक म्हणाले, आम्ही फिरायला म्हणून घराबाहेर येतो तर आम्हाला या प्रचंड धुळीत फिरावे लागते. धुळीमुळे अनेक रोग होत आहेत. मुख्याधिकारी यांना एसीमध्ये बसून नागरिकांच्या समस्या सोडवता येतात का? मुख्याधिकारी यांनी शहरातून चालत फेरफटका मारावा यानंतर त्यांना लक्षात येईल की धुळीचे प्रमाण आणि त्रास, असे त्यांनी म्हटले.