सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाची कागल एम.आय.डी.सी. येथे औद्योगिक क्षेत्र भेट
वाणिज्य विभागातील ३६ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर क्षेत्र भेट

सांगोला/अविनाश बनसोडे : सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील बी.कॉम भाग-3 मधील 36 विद्यार्थ्यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी कागल येथील शिंपूकडे मेटलगस प्रा. लि., तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे क्षेत्र भेट दिली.
यावेळी, व्यवस्थापकांनी कंपनीबद्दल आणि कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती दिली, माहितीमध्ये वेगवेगळ्या वाहनांच्या भागांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया कशी चालते याची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील औद्योगिक व्यवस्थापन विषयाच्या पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञान सुद्धा मिळाले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदासाठी भरती
दरम्यान,विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे जाण्याची प्रेरणा मिळाली. तसेच दिनांक 1 व 2 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध देवस्थान आदमापुर, तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, मस्यालय, थिबा पॅलेस, भगवती किल्ला, आरे वारे बीच, गणपतीपुळे येथे भेट देण्यात आली.
सदरच्या औद्योगिक क्षेत्र भेट व शैक्षणिक सहल यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विद्या जाधव, प्रा. सचिन सुरवसे प्रा.समाधान माने, प्रा.प्राप्ती लामगुंडे व महाडिक सर या सर्वांनी या क्षेत्र भेटीसाठी विशेष परिश्रम घेतले.