जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हयातील नोकरी आणि स्वंयरोजगार इच्छूक महिला उमेदवारांसाठी मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी दिली.
जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर मेळावा आयोजित करण्यात आला असून, या रोजगार मेळाव्यात सेल्स, ऑपरेटर, मार्केटिंग, बैंक ऑफिस, १० वी, १२ वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, बी.कॉम, एम. कॉम, अशा प्रकारची एकुण २५० पेक्षा जास्त रिक्तपदे ५ उद्योजकांनी आपली पदे अधिसुचित केलेली आहेत.
गुंठेवारीचा तिढा सुटला! १-२ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री आता शक्य?
सदर मेळावा हा रोजगार व स्वयंरोजगार मेळावा असल्याने या मेळाव्यात नवउद्योजकांकरिता राबवित असलेल्या योजनांची माहितीसाठी सर्व महामंडळे, मुद्रा योजना, स्वयंसहायता बचत गट कामकाज करणारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महानगर पालिका, महिला विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा रेशीम कार्यालय, आर-सेटी प्रशिक्षण संस्था आपल्या योजनांची माहिती महिला उमेदवारांना मिळणार आहे. जेणेकरुन, स्वयंरोजगार करणारे इच्छुक महिला उमेद्वारांना आपल्या योजनेचा लाभ मिळू शकेल व नवउद्योजक घडविण्याकरिता आपले मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभेल.
नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी बायोडेटांच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी ठीक सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत “राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), डफरीन चौक, सोलापूर” येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी आहे.