Solapur city Bhurla College
सोलापूर/हेमा हिरासकर : स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोलापूर शहरातील भुर्ला कॉलेज परिसरात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या जुन्या बसेसमुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी गैरप्रकार घडू नयेत, यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी तातडीने पावले उचलली आहेत.
इन पब्लिक न्यूजशी बोलताना किरण माशाळकर म्हणाल्या, भुर्ला कॉलेजमधील तरुणींच्या समस्या जाणून घेतली आहे. प्रशासनाने तातडीने बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. या बसेसची स्वच्छता आणि योग्य व्यवस्था न केल्यास कॉलेजमधील तरुणींना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर मुली सुरक्षित नाहीत. कॉलेज परिसरात गैरप्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे किरण माशाळकर यांनी सांगितले.
डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात तुफान खडाजंगी? झोपलेल्या संस्थाचालकांना जागे होण्याही गरज !
किरण माशाळकर यांनी दिला इशारा, म्हणाल्या…
- भुर्ला कॉलेज परिसरात अनेक वर्षांपासून जुन्या बसेस पडून आहेत.
- या बसेसमुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- किरण माशाळकर यांनी प्रशासनाला तातडीने या बसेसची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
- योग्य व्यवस्था न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
