राजकीयमहाराष्ट्र
धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला!
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का?

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे ते सतत चर्चेत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द
सागर बंगल्यावर धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कार्यमुक्त करण्याची अधिकृत घोषणा केली. आता मुंडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
आता धनंजय मुंडेंचे राजकीय भवितव्य काय?
- राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का?
- सध्या तरी त्यांच्यावर थेट आरोप नसल्याने आमदारकी रद्द होण्याची शक्यता कमी.
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात येणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
- विरोधकांचा आरोप : निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा आवश्यक होता