स्वारगेटमधील धक्कादायक माहिती, मदतीसाठी आरडाओरडा केला, यानंतर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे स्वतःला कंडक्टर असल्याचे भासवले.

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकावर मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दत्तात्रय गाडे या आरोपीला अटक केली आहे.
कंडक्टर असल्याचे सांगून…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे याने स्वतःला एसटी कंडक्टर असल्याचे भासवून पीडितेला शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांसाठी असलेला दुसरा दरवाजाही बंद केला.
जीव वाचवण्यासाठी पीडितेचा प्रतिकार नाही
पीडित तरुणीने परिस्थिती पाहून बसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडे याने तिला जबरदस्तीने सीटवर ढकलले. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण बसच्या काचा बंद असल्याने कोणालाही काही ऐकू गेले नाही. यावेळी नराधमाने पीडितेचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे पीडिता घाबरली.
दुहेरी अत्याचाराचा धक्कादायक प्रकार
जीव वाचवण्यासाठी पीडितेने काहीही विरोध केला नाही, याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडिता अत्यंत घाबरली असल्याचे पाहून त्याने दुसऱ्यांदा अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
https://www.instagram.com/reel/DGp5UGYtYx-/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==पोलिसांचा तपास सुरू, आरोपीला अटक
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. स्वारगेट एसटी स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे सुरक्षा यंत्रणेचे अपयश अधोरेखित होत आहे. पुणे एसटी स्थानकावर सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.