रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी धक्कादायक खुलासा : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हेगारांना कोणतीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुर्दैवाने या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी सामील आहेत. त्यांनी अतिशय निंदनीय प्रकार केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे. इतर आरोपींवरही लवकरच कारवाई केली जाईल.
गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे.कोणत्याही परिस्थितीत अशा गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
या प्रकरणानंतर राज्यभर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, महिला सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.